इंडियन ओवरसीज बँकेच्या शाखेचे नाशिकरोडला उद्धघाटन मोठ्या थाटामाटात संपन्न……
इंडियन ओवरसीज बँकेचे देवळाली शाखेचे उद्धघाटन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले. नाशिक रोड येथील कन्याकुमारी शाळेच्या बाजूला सिंधी कॉलनी समोर सिटी सेंटर कॉम्प्लेक्स याठिकाणी सोमवारी सकाळी 10 जुलै रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. इंडिया सिक्युरिटी प्रेसचे राजेश बंसल, बँकेचे रिजनल जनरल मॅनेजर चंद्रेमोहन आचारी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. इंडियन ओवरसीज बँकेची नाशिक शहरात नाशिक रोड, विजय ममता, महात्मा नगर आशा एकुन तीन शाखा आहेत. 12 मे 1980 पहिल्या शाखेचे उद्धघाटन नाशिक रोड पोलिस ठाणे समोर झाली होती त्यानंतर ती शाखा बिटको पॉइंट येथे पहील्या मजल्यावर ऑक्टोबर 2006 साली हलविण्यात आहे. सन 1980 पासून इंडियन ओवरसीज बँक ग्राहकांना अविरत सेवा देत आहे.
आता अगदी मोक्याच्या ठिकाणी तळमजल्यावर शाखा उपलब्ध झाल्याने महिलांना, वयोवृद्ध आणि सर्व नागरिकांना बँकेचे व्यवहार करण्यास सोयीस्कर होणार आहे. नाशिक रोड नंतर विजय ममता जवळ, महात्मा नगर या ठिकाणी शाखा नाशिककरांच्या सेवेत रुजू झाल्या. इंडियन ओवरसीज बँकेने सर्वप्रथम पर्सनल लोन स्कीम सुरू केली होती. शासनाच्या विविध स्कीम बँकेने मोठ्या प्रमाणात राबविल्या आहेत. इंडिया सिक्युरिटी प्रेस, करन्सी नोट प्रेस यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दरमहा कोट्यावधींची उलाढाल होत असते. ऍडव्होकेट इरफान भाई शेख, डॉक्टर चंद्रकांत हिंगमिरे, शरद घाडे यांनी अधिक परिश्रम घेऊन इंडियन ओवरसीस बँकेची शाखा ही प्रेसच्या कर्मचाऱ्यांसाठी कशी हिताची ठरेल यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केला. राजेंद्र बन्सल यांनी बँकेचा आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कसा उपयोग करून घेता येईल यासाठी बँकेचे मॅनेजर यांच्याशी चर्चा करून कर्मचाऱ्यांना बँकेचे व्यवहार सुटसुटीत व वेळेत कसे करता येईल याबाबत चर्चा केली.
उद्घाटनाप्रसंगी परिसरातील नेतेमंडळी, कार्यकर्ते, खतेधरक, आणि नागरिकांनी मॅनेजर यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी इंडिया सिक्युरिटी प्रेस चे मुख्य जनरल मॅनेजर राजेश बंसल, इंडियन ओवरसीस बँकेचे रिजनल जनरल मॅनेजर चंद्रमोहन आचारी, मॅनेजर अमरदिप डोळस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते व्यापरी बँकेचे माजी चेअरमन निवृत्ती महाराज आरीगळे, वेध न्यूज चे संचालक योगेश कमोद, ऍडव्होकेट प्रदीप गोसावी, इरफान शेख, राजेंद्र चंद्रशेखर, चंद्रकांत हिंगमिरे, शरद धांडे, श्रीपाद वाजपे, रवी के, डॉक्टर चंद्रकांत हिंगमिरे, विशाल कॉम्प्युटर चे संचालक राजेंद्र पानसरे, टेलीपेथी मोबाईल चे संचालक रवी रामनानी, एडवोकेट रासाळकर, लक्ष्मीकांत लोहारकर, सुनील नाईक, सुभाष ढोकणे, आनंद गुजराती, गजानन आतरकर, निवेदिका सिंग, राहुल ठाकूर, सागर थोरात, रुपेश पगारे, नीतू मॅडम, राजाभाऊ कीर्तने, शाम सोनार, तुळशीदास इंगळे, रवींद्र सांबळे, मोहन मते, प्रेस कामगार, व बँक कर्मचारी, खातेधारक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.