अखेर मुख्य संशयित आरोपी फरार आरोपीला नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या…९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत……
प्रतिबंधित गुटखा पॅकिंग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश…….
नाशिकरोड पोलीसंनी प्रतिबंधित गुटखा पेंकिग करणा-या टोळीचा पर्दाफाश करून ९ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.१२ मार्च रोजी नाशिकरोड येथील गोसावी वाडी या भागात पोलिसांनी केलेल्या कारवाईत ९० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला होता पण एकूण झालेली कारवाई ही संशयास्पद होती कारण यातील मुख्य सूत्रधार मात्र फरार होता असल्याची चर्चा होती.
प्रतिबंधित गुटखा पॅकिंग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुखदेव काळे यांना गोपनीय माहिती मिळाली की काही जण अवैध्यरित्या गुटखा पॅकिंगचे मशिन व पॅकिंगचे साहीत्य तसेच कच्चा माल सुभाषरोड, नाशिकरोड येथून एका महिंद्रा कंपनीची पिकअप गाडीमध्ये जात आहेत.
सुखदेव काळे व गुन्हे शोध पथकामधील पोलीस अंमलदार यांनी बातमी प्रमाणे कारवाई करून गाडी
व गाडी मधील संशयितांना पाठलाग करून वालदेवी नदीचे पुलावर विहीतगाव कडे जाणारे रोडवर १६ मार्च रोजी ११:३० वाजता ताब्यात घेतले. रमीज उर्फ अझहर रियाज सैय्यद वय ३० वर्ष राहणार मन्सुरी चाळ, गोसावीवा नाशिकरोड, मोहम्मद अख्तर रजा वय २८ राहणार जमदाड चौक, मनमाड, नांदगाव, नाशिक, ताबीश इरफान शेख वय २० राहणार सरदार पटेल रोड, मनमाड, नाशिक, शोएब इम्तियाज पठाण वय २० राहणार जमदाड चौक, साह, नांदगाव, नाशिक, सुरज शिवपुजम राजभर वय २९ वय जमदाह चौक, मनमाड, नाशिक, रोहीत संजय वाळुंज वय २६ वर्ष राहणार भाबड वस्ती, मनमाड, नांदगाव, नाशिक अशी या संशयितांची नाव असून त्यांच्याकडून महिंद्रा कंपनीची पिकअप गाडी त्यामध्ये गुटखा पॅकिंगचे मशिन व कच्चा तयार गुटखा तसेच सदर माल पैकींग करण्याचे विमल पान मसाला नावाचे पैकेट रोल असे एकूण ९ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी रमिज उर्फ अजहर रियाज सय्यद यापुर्वी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाहाल आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी आणि नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, पोलिस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सुखदेव काळे, विष्णु गोसावी, विजय टेमगर,संध्या कांबळे, नाना पानसरे, अजय देशमुख, भाऊसाहेब नागरे, मनोहर कोळी, कल्पेश जाधव, सागर आडणे, दत्तात्रय वाजे, रोहीत शिंदे, प्रमोद ढाकने, महेंद्र जाधव, गोकुळ कासार, योगेश रानडे यांनी कारवाई केली आहे