देवळाली कॅम्प भारतीय जनता पार्टीची नवी कार्यकारणी जाहीर……
देवळाली कॅम्प येथील भारतीय जनता पक्षाची शहर कार्यकारणीमध्ये शहाराध्यक्षपदी जीवन गायकवाड यांना कायम ठेवण्यात येऊन ९ उपाध्यक्ष, १ कोषाध्यक्ष, १ संघटक सरचिटणीस, ४ सरचिटणीस, ८ चिटणीस यांसह महिला, युवा, अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक, माजी सैनिक आघाडी, व्यापारी व कायदा आघाडीच्या अध्यक्षांसह सुमारे ४३ पदांचा समावेश असलेली जम्बो कार्यकारणी काल जाहीर करण्यात आली.
येथील भगवान झुलेलाल मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, सचिन ठाकरे, जिल्हा सरचिटणीस शरद कासार, बाबुराव मोजाड, तानाजी करंजकर, जिल्हाचिटणीस सुनील जाधव, तालुकाध्यक्ष अतुल धनवटे, तालुका सरचिटणीस भगवान कटारिया, बाबूशेठ कृष्णानी पंकज शेलार, अमोद शहाणे, दिनकर पवार, रतन कासार, शेखर कस्तुरे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा कार्यकारणीत समावेश करण्यात आला आहे.सर्व नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचा जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांच्या हस्ते निवडपत्र देत सत्कार करण्यात आला.
यांचा आहे कार्यकारणी समावेश
सरचिटणीस -मंगेश गुप्ता, सतीश कांडेकर, सुशांत करंजकर, अंकिता कटारिया. 
उपाध्यक्ष -सुरेश पाटील, मंगेश निसाळ, हेमंत गायकवाड, विलास घोडेकर, विनय गवळी, संतोष मेढे, छाया हाबडे,दिनेश साधवानी, किरण भागवत. 
कोषाध्यक्ष – रविंद्र एखंडे,
चिटणीस- निर्मल धामेजा,प्रकाश जोरवर,
करण मेन्द्रे, विवेक केळकर,शीतल पाटील, कमल धामेजा,स्वप्नील घोरपडे, सचदेव चड्डा. 
युवा मोर्चा – निलेश बंगाली, 
सरचिटणीस – सर्वज्ञ ओतूरकर, 
उपाध्यक्ष- आशिष गावडे, प्रतीक पाळदे, तुषार बोडके
महिला मोर्चा अध्यक्ष-कावेरी कासार 
सरचिटणीस- सुरेख कुलथे, उपाध्यक्ष – रागिणी हाबडे, रुपाली अवसरकर, लक्ष्मी वटारे.
अलपसंख्यांक सेल – मार्टिन फर्नांडिस
व्यापारी आघाडी – नारायण कटारिया 
वैद्यकीय आघाडी -डॉ.विजय चावला
माजी सैनिक आघाडी -प्रदीप गुरव
ज्येष्ठ नागरिक आघाडी- कौशल्य मुळाणे 
अनुसूचित जाती – जयेश पवार 
अनु-जमाती- राम गोडे
किसान मोर्चा – गेनू मोजाड, 
शिक्षक आघाडी – संदीप शेटे 
वाहतूक आघाडी – अंबादास काळे
