नाशिकरोड गोसावी वाडीत ९० हजार रुपयांचा प्रतिबंधित अवैध गुटखा जप्त…. नाशिकरोड गुन्हे शोध पथकाची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात…..
नाशिकरोड येथील गोसावी वाडी भागात पोलिसांनी केलेल्या कारवाईत ९० हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आले असून याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली असल्याचे समजते. परंतु एकूणच प्रकार पाहता झालेल्या कारवाईत पोलिसांची कारवाई संशयास्पद असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण चार जण या प्रकरणात संशयीत आरोपी असून या पैकी फक्त दोन जणांना पकडुन कारवाई दाखविण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.
गोसावी वाडी येथून गुटखा घेऊन अनेक जण नाशिकरोड ते भुसावळ दरम्यान रेल्वेत विक्री करीत असतात. नाशिक रोड पोलिसांनी केलेल्या कारवाईला वेगळ्याच चर्चेचे कोंदण मिळत असून या प्रकरणातील संशयित मुख्य सुत्रधारास मनमाड येथील एका नेत्याच्या अर्ध्या रात्री आलेल्या फोन वरून नाशिक रोड पोलिसांनी त्याचा सहभाग वगळून इतर संशयितांची नावे या गुन्ह्यात रेकॉर्डवर घेतल्याची चर्चा होत असुन नाशिक रोड पोलिस आणि मनमाड येथील नेत्यामध्ये झालेल्या खलबताची वरिष्ठ पोलीस अधिकारी दखल घेतील का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नाशिकरोड परिसरातील बिटको चौक, देवी चौक, सुभाष रोड आदी भागात गुटख्याची सर्रास विक्री चालू असून गुटखा विशेष सहज उपलब्ध असल्याने युवा पिढी व्यसनाच्या आहारी जात असून. यावर पायबंद घालण्याची गरज आहे. नाशिकरोड पोलिसांनी शिंदे गावातील ड्रग्स चे मोठे रॅकेट उघडकीस आणले होते त्याच प्रकारे इथेच न थांबता नाशिकरोड परिसरातील गुटखा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.