Home क्राईम देवळाली कॅम्पला चेष्टा मस्करी जीवावर बेतली….. अल्पवयीन मुलाचा मृत्यू

देवळाली कॅम्पला चेष्टा मस्करी जीवावर बेतली….. अल्पवयीन मुलाचा मृत्यू

0

देवळाली कॅम्पला चेष्टा मस्करी जीवावर बेतली….. अल्पवयीन मुलाचा मृत्यू

देवळाली कॅम्पला दोन अल्पवयीन मुलांमध्ये झालेली चेष्टा मस्करी एका मुलाच्या जीवावर बेतली असून याबाबत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ७ मार्च रोजी रात्री ९ वाजेचे सुमारास फिल्ट्रेषन प्लॅन्ट जवळ, जुनी स्टेशनवाडी, देवळाली कॅम्प
याठिकाणी दोन अल्पवयीन मुलांमध्ये काहीतरी मजाक मस्ती झाली, त्यात एकाने दुसऱ्याच्या डोक्यात मारले. त्यानंतर लवणीतच्या पोटात दोन बुक्के मारून त्याला खाली पाडून त्याचे गुप्तभागावर हाताचा कोपरा मारला. त्यावेळी तो बेशुध्द झाला म्हणून उपचारासाठी दवाखान्यात घेवून गेले पण काहीवेळानंतर लवणीत हा उपचारादरम्यान मयत झाला.


फिर्यादी प्रशांत सुनिल झिनवाल, वय १९ वर्ष, रा.जुनी स्टेशनवाडी, पवार वाडी, फिल्ट्रेशन जवळ, देवळाली कॅम्प, नाशिक यांच्या फिर्यादीवरून देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे. पोलिसांनी संशयित अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक एस.बी.अहिरे करीत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version