सिन्नर शहरातुन देशी बनावटीचे पिस्तूल जप्त…… स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई……
सिन्नर शहरातुन आणखी एक इसमास देशी बनावटीचे पिस्टलसह अटक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जीवंत काडतुस स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने ०७ मार्च रोजी सिन्नर शहरातील आणखी एका इसमावर अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी कारवाई केली आहे.
०७ मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे, सिन्नर शहरातील डुबेरे रोडवर हॉटेल रूद्रा परिसरात एक संशयीत इसम दहशत पसरविण्याचे उद्देशाने अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्टल कब्जात बाळगतांना दिसून आला असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सिन्नर ते डुबेरे रोडवर हॉटेल रूद्रा परिसरात सापळा रचुन संशयीत ज्ञानेश्वर उर्फ निलेश रामभाऊ शिंदे, वय ४३ वर्षे, रा. ढोकी फाटा, काळे मळा, सिन्नर, ता. सिन्नर, जि. नाशिक यास पाठलाग करून ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता संशयिताचा कब्जात एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मिळून आले. सदर इसम हा विनापरवाना बेकायदेशीररित्या घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगतांना मिळून आला असून त्याचेविरूध्द सिन्नर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताब्यात घेतलेला संशयित ज्ञानेश्वर उर्फ निलेश रामभाऊ शिंदे हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापुर्वी देखील अनेक गुन्हे दाखल आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने गेल्या ०४ दिवसांपुर्वी देखील सिन्नर शहरातील हॉटेल शाहू परिसरातुन अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे संशयितास ताब्यात घेवुन कारवाई केली होती. आगामी कालावधीत अवैधरित्या शस्त्रे बाळगणारे इसमांविरूध्द वरील प्रमाणे कारवाई करण्यात येणार असून कोणीही इसम अवैध शस्त्रे बाळगून गुन्हेगारी कारवाया तसेच दहशत निर्माण करीत असेल, तर नजीकचे पोलीस ठाण्यात संपर्क करावा असे आवाहन ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
सदर कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे, नवनाथ सानप, चेतन संवस्तरकर, विनोद टिळे, गिरीष बागुल, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांचे पथकाने केली आहे.