जेलरोडला दुचाकी जाळ्णाऱ्यांना एका तासात बेड्या….गुन्हे शाखा युनिट २ ची कामगिरी
जेलरोड परिसरातील पिंपळपट्टी परिसरातील भगवती लॉन्स शेजारी दोघा संशयितांनी दुचाकी जाळ्ल्याची धक्कादायक घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली होती. दरम्यान तपासाची चक्रे फिरवताच गुन्हे शाखा युनिट दोनने दुचाकींची जाळ्पोळ करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले होते. दरम्यान दुचाकी जाळ्ल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.
समाजकंटकांनी दोन मोटरसायकल पेटवून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला, घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट-2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही. डी. श्रीमनवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळु शेळके, प्रकाश भालेराव, विशाल पाटील, मनोहर शिंदे, शकंर काळे, प्रकाश महाजन, नितीन फुलमाळी आदींनी घटनास्थळी भेट दिली.
यानंतर दुचाकी जाळ्णाऱ्या अज्ञात समाजकंटकांचा शोध घेत असतांना पोलीस हवालदार विशाल पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार संशयित निखिल संजय बोराडे (वय 24, रा. पिंपळपट्टी रोड, जेलरोड), निलेश भास्कर कांबळे (वय 23 रा. बालाजी नगर, जेलरोड) या दोघांनी केला असल्याचे समजले. तसेच ते दोघे गुन्हा करुन बाहेर पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना जेलरोड येथील इंदिरा गांधी पुतळा येथे सापळा रचून शिताफिने एका तासाचे आत ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त, गुन्हे प्रशांत बच्छाव सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे डॉ. सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक .व्ही.डी. श्रीमनवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळु शेळके, विशाल पाटील,प्रकाश भालेराव, मनोहर शिंदे, शकंर काळे, गुलाब सोनार, प्रकाश महाजन, नितीन फुलमाळी आदींनी ही कारवाइ केली.