Home क्राईम गुटख्याची तस्करी करणारा आंतरराज्यीय गुन्हेगार इसरार मन्सुरी इंदोर मधून जेरबंद……  स्थानिक गुन्हे...

गुटख्याची तस्करी करणारा आंतरराज्यीय गुन्हेगार इसरार मन्सुरी इंदोर मधून जेरबंद……  स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

0

गुटख्याची तस्करी करणारा आंतरराज्यीय गुन्हेगार इसरार मन्सुरी इंदोर मधून जेरबंद……  स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी……

गुटख्याची तस्करी करणारा आंतरराज्यीय गुन्हेगार संशयित इसरार मन्सुरी याला इंदोर मधून जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. १४ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मुंबई आग्रा महामार्गाने मुंबई बाजूकडे जाणारा गुटख्याचा कंटेनर पकडून सुमारे २१ लाखांचा अवैध गुटखा जप्त केला होता. इगतपुरी पोलीस ठाण्यात भादवि कलम ३२८, २७२, २७३, १८८, ३४ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. गुन्हयात संशयित आरोपी  अमृत भगवान सिंह, रा. वडवेली, पो. हिनौतीया, ता. खिलचीपुर, जि. राजगड, मध्यप्रदेश व पुनमचंद होबा चौहाण, रा. सकारगाव, ता. बिकनगाव, जि. खरगोन, मध्यप्रदेश यांना अटक करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्यासह नजीकचे राज्यांमध्ये गुटख्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी करणारा मुख्य सुत्रधार इसरार मन्सुरी यास अटक करणेकामी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक इंदोर येथे खाना करण्यात आले होते. त्याप्रमाणे पोलीस पथकाने इंदोर शहरातील राऊ परिसरात रात्रभर पाळत ठेवून गुटखा माफिया इसरार मन्सुरी मुस्ताक मन्सुरी, वय ३५, रा. श्रमिक कॉलनी, राऊ, इंदोर, मध्यप्रदेश यास शिताफीने ताब्यात घेतले. गुन्हयाचा तपास इगतपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार करीत आहे. आरोपी इसरार मन्सुरी हा इंदोर, मध्यप्रदेश येथे गुटख्याची साठवणूक करून, बंद कंटेनरमध्ये गुटखा लपवून गुटख्याची विविध राज्यांमध्ये चोरटी तस्करी करत होता. सदर गुटखा माफिया हा ब-याच दिवसांपासून पोलीसांच्या नजरेआड गुटखा तस्करी करत होता. त्यास अटक केल्याने राज्यातील अवैध गुटखा नेटवर्कची पाळे मूळे खोदण्यास पोलीसांना यश येईल. सदरची कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक संदिप पाटील, चेतन संवस्तरकर, योगेश कोळी, गिरीष बागुल, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम तसेच पोलिस उप निरीक्षक  कांचन भोजने, पोहवा योगश भावनाथ, प्रकाश कासार यांचे पथकाने गुटखा माफीया इसरार मन्सुरी यास अटक केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version