देवळाली रेल्वे स्टेशनवर रेल्वे गाड्या थांबण्यासाठी विशेष मागणी….पुनर्विकास केवळ दिखाव्यासाठी…. रतन चावला
देवळाली रेल्वे स्थानकावर ज्यादा रेल्वे गाड्या थांबन्यासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांना निवेदन देऊन रेल्वे स्टेशनवर प्रवासी व व्यापारी यांच्या मागण्यानुसार रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा यासाठी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस रतन चावला यांनी केली आहे.
देवळाली रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण केवळ शोभेपुरते असून, गाड्यांचा थांबा नसल्याने पुनर्विकास केवळ दिखाव्यासाठी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस रतन चावला व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे.
देवळाली रेल्वेस्थानकावर कोरोना काळाच्या अगोदर २२ रेल्वेगाड्यांना थांबा देण्यात आला होता. मात्र कोरोना काळानंतर त्याची संख्या घटून केवळ बोटावर मोजण्याइतकी राहिली आहे. वास्तविक देवळाली रेल्वेस्थानकाला नाशिक, सिन्नर, इगतपुरी या तालुक्यातील शेकडो गावे व प्रवासी जोडले गेलेले आहेत. तसेच लष्कराचे प्रशिक्षण केंद्र येथे आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी येथे असल्याने देशभरातून सावरकरप्रेमी येथे येत असतात. याबाबत लोकप्रतिनिधींसह प्रशासनाला अनेकदा विनंती करून झालेली आहे. मात्र, कोणाकडूनही दखल घेतली जात नाही.