Home क्राईम २ लाख ७० हजार रुपये किमतीचा ५०० किलो गोमांस जप्त…… गुन्हेशाखा युनिट...

२ लाख ७० हजार रुपये किमतीचा ५०० किलो गोमांस जप्त…… गुन्हेशाखा युनिट २ ची कारवाई…..

0

२ लाख ७० हजार रुपये किमतीचा ५०० किलो गोमांस जप्त…… गुन्हेशाखा युनिट २ ची कारवाई..

गोवंश जातीच्या जनावरांची बेकायदा कत्तल केलेल्या मांसासह, ७ गोवंश जिवंत सोडवून गुन्हेशाखा युनिट क २ ने २ आरोपींच्या मुसक्या आवळून २ लाख ७० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. २३ फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखा, युनिट-२ चे विशाल पाटील यांना भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीत व्दारका जवळ असलेल्या हरि मंजील बिल्डींग जवळ कथडा भद्रकाली परिसरात असलेल्या एका पत्राचे शेडमध्ये गोवंश जनावरांची कत्तल सुरू असल्याची बातमी मिळाली.

सदर बातमीची खात्री करणेसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक अजय पगारे, सहायक पोलिस उप निरीक्षक बाळु शेळके, विवेक पाठक, प्रकाश भालेराव, शंकर काळे, विशाल पाटील व भद्रकाली पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकातील सतीश साळुंखे, कय्युम सैय्यद, निलेश विखे यांनी छापा टाकून एका पत्राचे शेडमध्ये ५०० कि.ग्रॅ. गोवंश मांस, जनावरे कापण्याचे हत्यारे, ०३ गायी, ०१ बैल व ०३ गो-हे आदी मिळून आले. गोमांस मिळून आल्याने फिरोज अब्दुल मजिद कुरेशी, वय ४२ वर्षे, धंदा भंगार, रा. सादीक नगर, गल्ली नं.२, वडाळा, नाशिक, कलीम सलिम शेख, वय ३२ वर्षे, धंदा भंगार, रा. हरिनगरी अपार्टमेंट, कठडा जुने नाशिक यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून २ लाख ७० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात केला आहे.


सदरची कारवाई पोलिस उपनिरीक्षक अजय पगारे, सहायक पोलिस उपनिरीक्षक बाळु शेळके, विवेक पाठक, प्रकाश भालेराव, शंकर काळे, विशाल पाटील, मनोहर शिंदे, सोमनाथ शार्दुल सुनिल आहेर, वाल्मीक चव्हाण, प्रकाश महाजन, मधुकर साबळे, अतुल पाटील, विशाल कुवर, समाधान वाजे आदींनी केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version